Friday, May 17, 2024

आता केलं ते २००४ लाच केलं असतं तर बरे झाले असते… अजित पवारांनी सांगितली ‘मनकी बात’…

इंदापुरामध्ये अजित पवार यांनी आतापर्यंतचा शरद पवार यांच्यासोबतच सर्व राजकीय इतिहासच उलगडून सांगितला आहे.

इंदापूरमध्ये एका मेळाव्यात अजित पवार म्हणाले, “सध्या या वयात अजितदादांनी पवार साहेबांना सोडायला नको होतं अशा चर्चांना पारावर सुरु असतात. मात्र मी साहेबांना कधी सोडलं नाही. मी 1987 ला राजकारण सुरू केलं तेव्हापासून 2023 पर्यंत साहेब सांगतील ती पूर्व दिशा समजून त्यांचं सगळं ऐकलं. 1967 साली पवार हे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले त्यांनाही संधी यशवंतराव चव्हाण यांनी दिली. प्रत्येकाला कोणी ना कोणी संधी देत असतं. तसेच संधी शरद पवार साहेबांनी मला दिली. 1972 ला शरद पवार हे राज्यमंत्री झाले आणि 1975 ला मंत्री झाले. 1978 ला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं सरकार पडलं आणि जनता पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यात आलं. त्यावेळी पवार साहेबांनी चव्हाण साहेबांच देखील ऐकलं नाही, असे अजित पवार म्हणाले.
“1999 ला सोनिया गांधी या परदेशी आहेत हा मुद्दा शरद पवार यांनी उचलून धरला . त्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आलं. नंतर महाराष्ट्राचे सर्व वरिष्ठ नेत्यांच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर लगेच काही दिवसातच परकीय मुद्दा सोडून पुन्हा काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आम्ही काही बोलू शकत नव्हतो. कारण ते दैवत होते, वडीलसमान होते. ते म्हणतील ती पूर्व दिशा असंच मी ऐकत आलेलो आहे. मी इतकं ऐकत आलेलो आहे की माझे काळे केसांचे पांढरे झाले. शरद पवार यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सोबत केली आहे.

1999 ला सरकार बनवण्यात आलं आणि 2004 ला देखील सरकार बनवलं तेव्हा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले होते. तेव्हा विलासराव देशमुख यांनी मला तुमच्यातील कोण मुख्यमंत्री होणार, अशी विचारणा केली होती. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री पद आणि चार मंत्रीपद जास्त घेऊ मुख्यमंत्री पदावर ती पाणी सोडण्यात आलं. साहेबांचा आदेश असल्याने आम्ही हू का चूक केलं नाही. तर आता कधीतरी वाटतं जे आम्ही आता केलं ते 2004 ला केला असता तर बरं झालं असतं, असं अजित पवार म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles