खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर व राहुरी विधानसभा लढवणार असल्याचे सूचक विधान प्रसार माध्यमांशी बोलतांना केले होते. या विधानामुले राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आले होते.यावर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील याना खोचक असा टोला लगावला आहे.
आमदार थोरात म्हणाले, मोठ्याचं ते लाडकं लेकरू आहे. त्याचा छंद असलच तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षाने नाहीतर तो पालकांनी पुरवला पाहिजे लेकराचा छंद. दोन ठिकाणी त्यांनी म्हटले आहे हा छंद पुरवण्यासाठी एकाच वेळी दोन ठिकाणी राहिले पाहिजे आणि छंद पुरवला पाहिजे त्यामुळे बालकांचा छंद पुर्ण होईल असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.
दरमयान विधानसभा निवडणूकीत अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच आता भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीबाबत सूचक असे वक्तव्य केले होते. ज्या तालुयात उमेदवारी बाबत समन्वय होणार नाही अशा मतदारसंघात मी निश्चित निवडणूक लढविणार आहे. संगमनेर किवा राहुरी हा मतदारसंघ माझ्यासमोर पर्याय असणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. याबाबत जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करत जोरदार टोला लगावला आहे.