पाईपलाईन रोड, गुलमोहोर रोड, तारकपूर रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या!

0
1410

Ahmednagar road…सावेडी उपनगर मधील प्रमुख रस्ते गुलमोहर_रोड,पाईपलाईन रोड तारकपूर मिस्किनमळा रोड संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चे अहमदनगर महानगरपालिका मध्ये ठिय्या आंदोलन
वरील सावेडी उपनगर मधील प्रमुख रस्ते हे आमदार संग्राम जगताप यांनी 10 ऑक्टोबर रोजी मंजूर केले परंतु अद्याप रस्त्याचे प्रत्यक्ष कोणतेही काम सुरू झालेले दिसत नाही गुलमोहर रोड वर दुकांना समोर खड्डे खोदून ठेवलेले आहे त्यामुळे धूळ ,अपघात सारख्या गोष्टींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे . अहमदनगर महानगरपालिका चे आयुक्त व संबंधित ठेकेदाराने नागरिकांना वेठीस धरले आहे . त्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले व आयुक्त यांना प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करण्यास भाग पाडले 2 दिवसात काम सुरू करून 31 मे पर्यंत पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्त यांनी दिले.
या प्रसंगी अहमदनगर पालिकेचे स्थायी समिती सभापती कुमारभाऊ वाकळे पा,विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर,मा सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे,जेष्ठ नगरसेवक बाळासाहेब पवार,अजिंक्य बोरकर, सुनील त्रिंबक्ये,सागर बोरुडे,नितीन बारस्कर व तसेच गुलमोहोर रोड भागातील कुमारशेठ नवले, मंगेश सोले,पठारे भाऊसाहेब, बापू जानवे, अभय शेठ खाबिया, विकी सीरिया, राहुल जाधव,योगेश खरमाळे, प्रशांत धाडगे,हर्षल बांगर,सचिन दारकुंडे,संदीप चौधरी, अमोल बोऱ्हाडे,अनुप सत्राळकर,ऋषी सोले, प्रयास कांबळे,रणवीर शितोळे,सचिन कसबे, किरण पवार,गणेश अदमाणेआशुतोष लहारे, प्रतीक भोगे, सोनू लहारे आदी उपस्थित होते.