पुणे पोलीस आयुक्तांची अत्यंत महत्वाची माहिती,अग्रवाल कुटुंबाचा अंडरर्वल्डशी संबंध ?

0
18

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरण सध्या वेगवेगळी वळणं घेतंय. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. अग्रवाल कुटुंबाचे खरंच अंडरवर्ल्डशी संबंध होते का? यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भाष्य केलं आहे. अग्रवाल कुटुंबाचा अंडरर्वल्डशी संबंध आहे का यासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे. विशाल अग्रवालचा अंडरवर्षी संबंध आहे का याबाबत ही चौकशी केली जाणार आहे.गाडीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आरटीओकडून माहिती मागविण्यात आली आहे, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.अपघातातील अल्पवयीन आरोपीला अडल्ट म्हणून घोषित करण्याची विनंती आम्ही कोर्टाकडे केली आहे. शिवाय आरोपीला रिमांड होम मध्ये दाखल करावं अशी ही विनंती करण्यात आली आहे. कोर्टाने अडल्ट म्हणून घोषित केल्यावर पुणे पोलीस आरोपीची तात्काळ कस्टडी घेणार आहे, अशी माहिती देखील अमितेश कुमार यांनी दिली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचा भावासोबत संपत्तीसंदर्भात वाद झाला. यावेळी सुरेंद्र अग्रवाल यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती. त्यावेळी छोटा राजनच्या गुंडांनी गोळीबारही केला होता. यावेळी एफआयआर देखील दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.