उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. नुकताच अमृता फडणवीस यांनी वॉट झुमका या गाण्यावर एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘वॉट झुमका’
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधील वॉट झुमका या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हे गाणं झुमका गिरा रे या गाण्याचं नवं व्हर्जन आहे. हे गाणं सोशल मीडियावर देखील ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्स अनेक जण इन्स्टाग्रामवर शेअर करत आहेत. अशातच आता अमृता फडणवीस यांनी वॉट झुमका या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, “ट्रॅफिक जॅममध्ये करमणूक, # झुमका”






