नगरमध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी ,३३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे बक्षीस

0
31

नगरमध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी

३३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे बक्षीस

नीलेश लंके प्रतिष्ठानचा पुढाकार

नगर : प्रतिनिधी

नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगर शहरात शनिवार दि.३१ रोजी जिल्ह्यातील सर्वात मोठया दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ थरांच्या या दहीहंडीसाठी ३३ लाख ३३ हजार ३३३ रूपयांचे बक्षिस ठेवण्यात आले असून कालीचरण महाराज हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराजांचे यावेळी शिवतांडव नृत्यही होणार आहे. मा. नगरसेवक प्रदिपभैय्या परदेशी यांनी या दहीहंडीचे नियोजन केले असल्याचे खा. लंके यांनी सांगितले. या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लंके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.