Saturday, October 5, 2024

थेट मोदीच्या सभेत झळकावले केजरीवाल यांच्या अटकेचे फलक,पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

थेट मोदीच्या सभेत झळकावले केजरीवाल यांच्या अटकेचे फलक
आपच्या पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (दि. 7 मे) झालेल्या सभेत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ जेल का जवाब वोट से ही पत्रके झळकावले.
पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना ही पत्रके भर सभेत स्टेजच्या समोर आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी झळकावले. यावेळी पोलीसांनी आघाव व शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवले. यावेळी पोलीस स्टेशनला दिलीप घुले, गणेश मारवडे, राजेंद्र कर्डिले आदी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सभा संपल्यावर आपच्या कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles