७वी ते १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; बँक ऑफ इंडियामध्ये भरती

2
55

बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिसरमार्फत भरती जाहीर करण्यात आली आहे.बँक ऑफ इंडियामध्ये वॉचमन पदासाठी भरती सुरु आहे. ७वी ते १०वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. याबाबत जाहिरात बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहे.

बँकेत वॉचमन पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १२००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २२ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.रत्नागिरी येथील कार्यालयात ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असावा. या नोकरीसाठी भरती ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहेतय

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी १३ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे बँक ऑफ इंडिया स्टार सिंधुदुर्ग आरसीईटी, लाललुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर, तहसील कार्यालयाजवळ, कुडाळ येथे पाठवायचा आहे.

2 COMMENTS

Comments are closed.