Tuesday, May 28, 2024

रात्रीस खेळ चाले…बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस… व्हिडिओ

विरोधकांकडून मतदाराना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष यांनी केला आहे. बारामती शहरातील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहेत तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप देखील शहराध्यक्षांनी केला आहे. भोर तालुक्यात एका गावात रात्री पैशांचं वाटप झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांनी एक्स पोस्टवर व्हिडिओ शेअर करत पैसे वाटप झाल्याचा आरोप केलाय.

भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय.

वेल्हेतील जिल्हा मध्यवर्ती बँक ही रात्री 12 वाजले तरी बँक सुरू होती. मतदान असल्याने कदाचित बँका सुरू आहेत, असे म्हणत रोहित पवारांनी थेट निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. रात्री 12 वाजता बँका सुरू असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केला आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/1787564532506009826

https://x.com/RRPSpeaks/status/1787552093307617403

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles