Friday, May 3, 2024

बारामतीत पवार कुटुंबातील भाऊबंदकी शिगेला, अजित पवारांनी जुनं सर्वच काढलं….

बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत दिवसेंदिवस रंगत जात आहे. नणंद-भावजयीमधील या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर, अजित पवारांनीही यात आता उडी मारली असून सुनेत्रा पवारांसाठी त्यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. “लोकांना भावनिक केलं जातं. कालच्या शरद पवारांच्या सभेत अमेरिका टाईम्सचा पत्रकारासह अनेक पत्रकार मंडळी आली होती. यावेळी शरद पवार खुर्चीवर बसले होते. तर सुप्रिया, रोहित आणि युगेंद्र पायापाशी बसले होते. अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते होते. म्हणजे हे अमेरिकेतही पोहोचलं की बघा कुटुंब कसं एक आहे. पण मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा साहेब एकेठिकाणी बसले असतील तर मी दुसरीकडे बसायचो”, असं अजित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, ती (रोहित पवारांसह इतर भावकीतील मुलं) माझीही मुलं आहेत. शरद पवारांनी मला खासदार केल्यावर एकाचा जन्म झाला. आणि काल तो सांगतो की साहेबांनी सर्व संस्था काढल्या. ३१-३२ वर्षे मी नुसताच शांत बसलो. मी काहीच केलं नाही. बारामती जी काही सुधारली ती इतरांमुळे सुधारली. अजितचा काडीचा संबंध नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बारामती बँक पूर्वीच होती. मार्केट कमिटी कधीची आहे, फार पूर्वीपासूनची आहे. नगरपालिका १८६५ मधली आहे. तुमचा आमचाही जन्म झाला नव्हता. पण ते म्हणतात संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता. काय डोकं चालतंय?”, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles