Friday, March 28, 2025

मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनतेच्या विकासाची हमी : खा. सुजय विखे पाटील

कर्जत-भारताने अमृतकाळात प्रवेश केला असून मोदी पर्वात जगावर आपला ठसा उमटविला आहे. देशात सुरू असलेली मोदी गॅरंटी ही निवळ घोषणा नसून १४० कोटी जनतेच्या विकासाची हमी असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या केवळ १० वर्षाच्या काळात विकसित देशाकडे वाटचाल केली चालू केली आहे. ११ व्या स्थानावर असेललेली अर्थव्यवस्था मोदीजींनी ५ व्या स्थानावर आणली. यामुळे मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनतेच्या विकासाचा मुलंमत्र असल्याचेही खा. सुजय विखे म्हणाले. ते कर्जत येथिल कर्जत तालूक्यातील निमगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे यांच्या सह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सुजय विखे म्हणाले की मोदी पर्वात सबका साथ, सबका विकास या भावनेतून अशा समाजाची निर्मिती केली, जिथे सर्वांना स्थान आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जिवंत ठेवला. मोदीजींनी समृध्द व सुरक्षित देशाचा संकल्प केला आहे. आणि तो मोदी गॅरंटीतून जपला जाणार आहे. आज संपुर्ण जगाला भारताच्या आर्थिक धोरणांवर विश्वास निर्माण झाला आहे.जगभरातून विविध गुंतवणुकीचा ओघ वाढत चालला आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. असे सुजय विखे म्हणाले.

देशात मोदी गॅरंटीवर देशवासियांचा विश्वास आहे. २०१४ मध्ये भारतावर अनेक संकटे होती. त्यावर मोदीजींनी मात करत परराष्ट्र संबंध मजबूत केले. यामुळे जी २० चे प्रतिनिधित्व भारताने केले. याचा प्रत्येक भारितयांना अभिमान आहे. म्हणुन एक सर्वांगिण प्रतिनिधित्व म्हणुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाबरोबर जगाचे लक्ष लागले आहे. ह्या निवडणुकीत देशाच्या प्रगती बरोबर जगात भारताची भूमिका काय असणार हे ठरले जाणार असल्याने केवळ मोदीच हे एकमेव पर्याय आहेत असेही सुजय विखे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. नगर जिल्ह्यातही त्याच्या मार्फत मोठा निधी आला असून अनेक विकास कामे मार्गी लागली. यामुळे जिल्ह्यात पुन्हा विकासाचे पर्व महायुतीचा उमेदवारच सुरू ठेऊ शकतो. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles