Friday, May 17, 2024

अमोल कोल्हेंची वाढणार चिंता? बारामतीनंतर शिरुरमध्येही अपक्षाच्या हाती ‘तुतारी’

बारामती लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह असतानाच तशाच पद्धतीचे दुसरे चिन्ह दिल्याने आक्षेप घेण्यात आला होता. आता बारामतीनंतर शिरुरमध्येही तुतारीवरुन मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे.
बारामती लोकसभेप्रमाणेच आता शिरूर लोकसभेत ही अपक्ष उमेदवारास तुतारी चिन्ह मिळालं आहे. त्यामुळं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हेची चिंता वाढण्याची शक्यता आहे. शिरुर लोकसभेचे अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रंपेट हे वाद्य चिन्ह म्हणून दिले आहे.

परंतु निवडणूक आयोगाने ट्रंपेट या वाद्याचा उल्लेखही तुतारी असाच केला आहे. त्यामुळे वाद्य वेगवेगळी असली तरी चिन्हाचे नाव मात्र एकच आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles