Monday, May 20, 2024

चाणक्य सूत्र… आयुष्यात ‘या’ लोकांशी कधीच वाद घालू नका..

Chanakya Niti…
चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला जीवनातील त्रास आणि पश्चात्ताप टाळायचा असेल तर तुम्ही काही लोकांशी कधीही वाद घालू नका. या लोकांशी वाद घालणे तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते.

मूर्ख व्यक्ती : आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नये. यातून तुमचा वेळ तर वाया जातोच पण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून ते तुमची प्रतिमाही खराब करू शकतात. त्यामुळे मूर्ख व्यक्तींपासून अंतर ठेवणे चांगले.

चांगले मित्र :चांगला आणि खरा मित्र हा प्रत्येक सुख-दु:खाचा सोबती असतो. जर तुम्ही त्याच्याशी वाद घातला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अतिशय प्रेमळ आणि विश्वासार्ह नाते गमावाल. याशिवाय जर एखाद्या मित्राचे मन बदलले तर तो तुमची अनेक गुपिते उघड करून तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

परिजन :आई-वडील, भावंड, पत्नी किंवा मुलांशी कधीही अशा प्रकारे वाद घालू नका की नाते तुटण्याच्या टोकापर्यंत पोहोचेल किंवा मनात तेढ निर्माण होईल.

गुरू: जीवनात गुरुची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करतात. ते आपल्याला आव्हानांना कसे सामोरे जावे हे सांगतात, ज्ञान देतात. म्हणून गुरूशी कधीही वाद घालू नका

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles