Monday, May 20, 2024

जंगल सफारीतील धक्कादायक व्हिडीओ… ३ चित्त्यांनी पर्यटकांच्या गाडीला घेरलं..

जंगली प्राण्यांना मोकळ्या जंगलात शिकार करताना पाहण्याची मजा काही औरच असते. कारण जंगलात त्याचं खरं रूप पाहायला मिळतं. अन् त्यामुळेच ही मजा घेण्यासाठी बहुतांशी लोक जंगल सफारीवर जातात. पण जंगल सफारी करणं काही सोपं काम नाही. काही वेळेस जंगली प्राणी नको तितके जवळ देखील येतात. आता हाच व्हिडीओ पाहा ना, काही चित्ता सफारीवर निघालेल्या पर्यटकांच्या गाडीत शिरले. अक्षरश: हातांच्या अंतरावर बसून ते पर्यटकांना पाहात होते. या दरम्यान पर्यटकांनी सुद्धा मृत्यूची भिती काय असते हा अनुभव घेतला असेल.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. ३ चित्त्यांनी पर्यटकांच्या गाडीला घेरलं आहे. यापैकी एक चित्ता थेट छतावर चढलाय दुसरा बोनवर उभा आहे आणि तिसरा तर थेट गाडीत जाऊन पर्यटकांसोबत बसला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles