अशोक सराफांसोबत काम करण्याचा मलाही दोन चित्रपटात योग आला; मंत्री भुजबळ म्हणाले…

0
19

‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. फक्त सिनेसृष्टीतीलच नव्हे तर राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनीही मामांचं कौतुक केलं आहे. राज्याचे मंत्री, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी एक खास फोटो शेअर करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय, तसंच जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.
मराठी अभिनय सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि माझे मित्र अशोक सराफ यांना राज्य सरकारकडून २०२३ चा महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!