Monday, April 22, 2024

Video : ‘चोली के पीछे क्या है…गाण्यावर करीना कपूरचा ग्लॅमरस अंदाज

३१ वर्षांपूर्वी ‘खलनायक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आलेल्या ‘चोली के पीछे क्या है…’ या आयकॉनिक गाण्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. अलका याग्निक आणि ईला अरुण यांनी गायलेलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे परंतु, या गाण्यावरुन त्या काळात खूप वादही झाला होता. आता २०२४ मध्ये ‘चोली के पीछे क्या है…’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पण, यावेळी माधुरीच्या जागी या गाण्यावर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान अर्थात बेबो थिरकताना दिसणार आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या रिमिक्स गाण्यांचा ट्रेंड चालू आहे. अशातच माधुरीच्या आयकॉनिक गाण्याचं रिमिक्स व्हर्जन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात करीना कपूर खानचा गुलाबी साडीतील ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. रिमिक्स व्हर्जनला दिलजीत दोसांझ, आईपी सिंग, अल्का याग्निक व ईला अरुण यांचा आवाज देण्यात आला आहे. अर्थात गाण्याच्या मूळ रुपांतरात जास्त बदल न करता प्रेक्षकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न संगीतकारांनी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles