एका निवृत्त जोडप्याने स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट चालू केलं आहे. तसेच निवृत्तीचा काळ आनंदात घालवण्यासाठी ते एका रोड ट्रीपवर निघाले आहेत. रोड ट्रीपला जाणे हे अनेक प्रवाशांचे स्वप्न आहे. तर हेच स्वप्न एक निवृत्त जोडपं जगत आहे आणि ते त्यांचा प्रवास सोशल मीडियाद्वारे इतरांसोबत शेअर करीत आहेत. या जोडप्याने जानेवारीमध्ये दिल्ली ते कन्याकुमारी असा ५२ दिवसांचा प्रवास सुरू केला होता. रोड ट्रीपसाठी त्यांना एक व्हॅन मिळाली, ज्यामध्ये लहान स्वयंपाकघर (होम ऑन व्हील्स) आहे. जोडप्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते गाडीत जेवण बनवतानासुद्धा दिसले आहेत.
निवृत्तीचा काळ आनंदाचा..रोड ट्रीप; ५२ दिवसांचा प्रवास अन् गाडीतलं किचन.. व्हिडिओ
- Advertisement -