Crime news…एसटी चालकास मारहाण, नगरमधील एक अटकेत

0
922

नगर: एसटी बस चालकास मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात भिंगार कॅम्प पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

प्रज्योत उर्फ शिवम प्रकाश लुनिया (वय ३५ रा. ब्राम्हण गल्ली, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३० मार्च रोजी शेवगाव डेपोतील बस चालक गणेश गोरक्षनाथ शेळके (वय ४१ रा. खांडगाव ता.पाथर्डी) हे एसटी बस (एमएच ४० एन ८७५०) माळीवाडा बस स्थानकातून शेवगावकडे घेवून होते.
भिंगार येथील समाधान हॉटेलजवळ दुचाकीवरील (एमएच १६, सीएन ४७७१) अज्ञात आरोपींनी एसटी बसला दुचाकी आडवी लावून बस चालकास शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली होती. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.