Wednesday, November 29, 2023

क्रुरतेचा कळस! मोठ्या भावाला कारच्या बोनेटवर ३ किमीपर्यंत फरफटत नेले…व्हिडिओ

जमिनीचा, संपत्तीचा वाद फारच भयंकर. जमिनीच्या वादातून अख्खी कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. संपत्तीच्या मोहापायी रक्ताचीच नाती वैरी बनल्याची अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये सख्ख्या भावानेच भावाला गाडीच्या बोनेटवर बसवून ३ किमीपर्यंत फरफटत नेल्याचे दिसत आहे.
दिल्लीमधील अलिपूर परिसरात एका व्यक्तीला त्याच्या छोट्या भावाने गाडीच्या बोनेटवर बसवून तब्बल ३ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती गाडीच्या बोनेटला लटकत आहे. तर गाडी चालवत असलेला त्याचाच सख्खा भाऊ वेगाने कार पळवत असल्याचे दिसत आहे. वेगाने गाडी चालवताना तो बोनेटवर लटकत असलेल्या राजेश कुमार याला खाली पाडण्याचाही प्रयत्न करत आहे.

राजेश कुमार, असे या घटनेत जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून ते हरियाणातील सोनिपत सेक्टर १५ येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. राजेशचा भाऊ महेश याच्या तक्रारीवरून अलिपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: