Saturday, May 11, 2024

माढ्यात देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी… मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी दुसरे मोहिते पाटील गळाला…

माढा लोकसभा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डाव प्रतिडावांमुळे प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनला आहे. त्यामुळेच शरद पवारांनी 3 सभा घेत प्रचाराचा धडाका लावलाय. तर आता शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सलग तीन सभांचा धडाका लावणार आहेत. सभा घेण्यापूर्वीच फडणवीसांनी अकलूजमध्ये काँग्रेसला खिंडार पाडलंय. महायुतीच्या रविवारी (दि. 27) होणाऱ्या सभेसाठी मोहिते पाटील कुटुंबातील डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील () हे उपस्थित राहणार आहेत.

डॉ.धवलसिंह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, फडणवीसांच्या खेळीने अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या विरोधात दुसरे मोहिते पाटील भाजप बाजूने मैदानात उतरणार आहेत. डॉ. धवलसिंह हे माजी सहकार मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र असून त्यांचा अकलूज परिसरात मोठा गट आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles