Tuesday, May 13, 2025

बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार ही बाब दुर्दैवी … एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर बरसले…

कोल्हापूर येथील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार ही बाब दुर्दैवी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना जेव्हा महाविकास आघाडीने तिकिट दिलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं. “वर्षाताई माझं मत तुलाच” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुनच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.आता त्यांना (उद्धव ठाकरे) हिंदू हा शब्द उच्चारण्याचीही लाज वाटू लागली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे म्हणायला त्यांची जीभ कचरते. उबाठाची आता काँग्रेस झाली आहे. त्यामुळेच आपल्याला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींसारखा कर्तृत्ववान नेता निवडायचा आहे. देशात उष्मा वाढला की विदेशात पळणारा नेता (राहुल गांधी) आपल्याला नको.” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles