Tuesday, May 21, 2024

वारं फिरलंय?…अजितदादांचा आमदार ‘तुतारी’च्या उमेदवाराच्या बैठकीत

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. भास्कर भगरेंचा दिंडोरीत जोरदार प्रचारदेखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ हे उपस्थित होते. दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या मांडीला मांडी लावून नरहरी झिरवाळ त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आले. दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्याने झिरवाळ नाराजी असल्याची चर्चा आता रंगली आहे. तसेच नरहरी झिरवाळ हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट निवडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles