Tuesday, May 21, 2024

डॉ.निलेश म्हस्के यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध, आरोपींवर कडक कारवाईची मागणी

तिसगाव येथील एका डॉक्टर आला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.द्दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील तिसगाव येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ.निलेश म्हस्के यांना पाच ते सहा अज्ञात तरुणांनी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन मारहाण केल्याची घटना घडली आसुन या घटनेमुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.मात्र याबाबत पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.या घटनेचा तालुका वैद्यकीय संघटनेने निषेध व्यक्त करत उद्या शनिवारी बंद पुकारला आहे
.आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान तिसगाव शेवगाव रस्त्यावरील डॉ. निलेश म्हस्के यांच्या आई हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉ. म्हस्के यांना मारहाण केली.डॉ.म्हस्के यांना मारहाण झाल्याचे समजताच पाथर्डी व तिसगाव येथील डॉ.भगवान दराडे,डॉ.स्वागत ससाणे,डॉ.महेश बारगजे,डॉ.प्रताप वाघ,डॉ.अतुल बांगर,डॉ.अच्युत चितळे,डॉ.धनंजय लवांडे,डॉ. सलमान शेख,डॉ.संदीप भाबड,डॉ.सुरेश आव्हाड,डॉ.विनोद गर्जे,डॉ.बाळकृष्ण मरकड,डॉ.एस.के.टापरे,डॉ.आदी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात आले व त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून उद्या शनिवारी दि. ९ एप्रित २०२२ रोजी तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आपला व्यवसाय बंद ठेवुन निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles