Tuesday, May 21, 2024

गरीब शेतकरी कुटुंबाच्या घराला आग…संसारोपयोगी साहित्य भस्मसात

शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरातल्या चिंचपूर रोड वरील संगमेश्वर मळा येथील असलेल्या हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस राहणाऱ्या अशोक संभाजी कटके यांच्या घराला अचानक पणे आग लागली.आग लागल्यानंतर काही वेळातच आग संपूर्ण घरामध्ये पसरली.यामध्ये दैनंदिन वापरात असलेल्या संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले.आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही.कटके कुटुंब शेतकरी असून पत्र्याच्या छोटयाशा शेडमध्ये ते राहात होते. नेहमीप्रमाणे ते शेतात काम करायला गेले तर घरातील महिला रोजंदारीवर मजुरीसाठी गेल्या होत्या.
त्यावेळी दुपारी अचानक घरामध्ये आगीचा भडका दिसला त्यानंतर त्यांची एकच धावपळ उडाली.आग कशामुळे लागली हे नेमके कारण समजू शकले नाही.मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने व दहा बारा दिवसापासुन तीव्र उष्णता असल्यामुळेच आग लागली आसल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होती.सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नाही.मात्र रोख रक्कम व मौल्यवान ऐवज जळुन गेल्याने कटके कुटुंबाचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे. पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणुन विझवली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles