Monday, May 20, 2024

स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार शोधताय? ‘या’ आहेत भारतातील स्वस्त ईलेक्ट्रिक कार

Electric Cars… सध्या पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक कार महाग आहेत. परंतु, इलेक्ट्रिक कार चालवण्याचा खर्च कमी आहे. त्यामुळे लोक इलेक्ट्रिक कारचा पर्याय शोधू लागले आहेत.
तुम्हाला काही स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती देणार आहोत. यामध्ये टाटा कंपनीची टाटा टिगोल, टाटाचीच नेक्सन कार, ह्युंदाई कोना आणि आणि एमजी ZS या इलेक्ट्रिक कार स्वस्त आहेत.

टाटा टिगोर कार
टाटा टिगोर या इलेक्ट्रिक कारची किंमत 12.24 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. यात 26 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. त्याची रेंज 306 किमी आहे. कारमध्ये 55 kW (74.7 PS) मोटर आहे. जी 170 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

एमजी ZS
एमजी ZS ही इलेक्ट्रिक कार 44-kWh बॅटरी पॅक करते. जी नियमित 15 अँपिअर वॉल सॉकेटमधून 17-18 तासांत पूर्णपणे चार्ज होते. या कारची बॅटरी 50 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होते. एका चार्जवर ही कार 499 किमीची रेंज देते. या कारची किंमत 20.99 लाख रुपये पासून सुरू होते.

ह्युंदाई कोना
ह्युंदाई कोनाही इलेक्ट्रिक SUV कार आहे. ह्युंदाई कोना या कारची किंमत 23.79 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 39.2 kWh ची बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 452 किमीची रेंज देते. या कारची बॅटरी एका तासात 80 टक्के पर्यंत चार्ज होते.

टाटा नेक्सन कार
टाटाच्या नेक्सन कारची किंमत 14.54 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार 9.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. यात IP67 प्रमाणित 30.2 kwh लिथियम-आयन बॅटरी आहे. कारची रेंज 300km पेक्षा जास्त आहे. कारमध्ये कायमस्वरूपी चुंबक एसी मोटर आहे. जी 245 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles