Monday, May 20, 2024

नियमित केळी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे…‘या’ समस्या होतील हद्दपार

Health tips banana केळी खाण्याचे विशेष आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ. केळी हे असं एक फळ जे सगळीकडे अतिशय मुबलक प्रमाणात आणि स्वस्तात उपलब्ध असतं. तज्ज्ञ सांगतात की दररोज फक्त एक केळ खा.. यामुळे शरीराला अनेक लाभ मिळतात. जर तुमचं वर्कआऊट चांगलं असेल किंवा भरपूर अंग मेहनतीचं काम करत असाल तर दोन केळी दिवसभरातून खा. पण त्यापेक्षा अधिक नको.

न्युट्रीशन बुलेटीनच्या सर्वेक्षणानुसार केळी आतड्याच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. आतड्याची कार्यक्षमता चांगली असली की आपोआपच खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात.

केळीमध्ये फायबर आणि प्रथिने यांचे चांगले प्रमाण असते. त्यामुळे जेव्हा आपण केळी खातो तेव्हा अधिक काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीरात उर्जा टिकून राहते. पण वजन घटविण्यासाठी केळी खाणार असाल तर दिवसभरातून १ पेक्षा अधिक केळ नकोच.

केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. हृदयाच्या आरोग्यासाठी पोटॅशियम खूप आवश्यक आहे. अनेकदा पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्याने रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी आणि हृदयासंबंधी इतर काही तक्रारी उद्भवू नये, यासाठी नियमितपणे केळी खाणे फायद्याचे ठरते.

नजर तेज व्हावी, लहान मुलांना लवकर चष्मा लागू नये, डोळ्यांचे आरोग्य चांगले असावे, यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण डोळ्यांच्या दृष्टीने केळीदेखील गाजराएवढीच उपयुक्त आहे.

केळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे मँगनीज केळीमध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दररोज १ केळ खाल्ल्यास पिंपल्स, त्यांचे काळे डाग, कोरडी निस्तेज त्वचा असा त्रास दूर होतो

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles