Tuesday, May 21, 2024

फ्लिपकार्टची आरोग्यसेवा, प्रिस्न्पिशन पाठवा…औषधे घरपोच!

Flipkart…नवी दिल्ली : फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी एक नवीन सेवा आणली आहे. कंपनी आरोग्यसेवा क्षेत्रात उतरणार आहे. वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने नवीन आरोग्य अॅप लाँच केले आहे. फ्लिपकार्ट हेल्थ प्लस असे या अॅपचे नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून कंपनी लोकांना आरोग्य सुविधा पुरवणार आहे. यासोबतच आता लोकांना फार्मसी, नेटमेड्स, अपोलो 24*7 यासारख्या अनेक कंपन्यांसोबत एक नवीन आरोग्य अॅपचा लाभ मिळणार आहे.

कंपनीने म्हटले आहे की, ही सुविधा ग्राहकांना 20 हजारांहून अधिक पिनकोडवर दिली जाईल. यासोबतच 500 हून अधिक औषध विक्रेते या नेटवर्कशी जोडले जातील आणि लोकांपर्यंत औषधे लवकरच आणि स्वस्त दरात पाठवली जातील. अॅप वापरताना लोकांना त्यांचे औषध प्रिस्क्रिप्शन अपलोड करावे लागेल. यानंतर कंपनी लवकरात लवकर त्यांच्या औषधाच्या पत्त्यावर पोहोचेल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्लिपकार्ट हेल्थ प्लसचे फीचर्स फ्लिपकार्ट अॅपमध्ये उपलब्ध होणार नाहीत. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट हेल्थ प्लस अॅप स्वतंत्रपणे डाउनलोड करावे लागेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles