Video: भर पावसात गौतम पाटील थिरकलीय , बेधुंद अदाकारीने चाहते घायाळ

0
50

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने तरुणाईवर चांगली मोहिनी घातली आहे. सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून तिने ख्याती मिळवलेली आहे. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम कुठेही असला तरी तुफान गर्दी असते. तिच्या कार्यक्रमात अनेकदा गर्दीमुळे गोंधळ झाला आहे. काही वेळा तिचे कार्यक्रम रद्द करण्याचा प्रसंग आयोजकांवर आला. गौतमी पाटील संदर्भात तरुणाईमध्ये असलेल्या क्रेझमुळे मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर लहान-लहान गावांमध्ये तिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आता पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये गौतमी पाटील हिचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास तुफान गर्दी झाली. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. परंतु चाहत्यांना नाराज न करता गौतमी पाटील हिने पावसात आपली अदाकारी सादर केली.

शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे शिवछावा प्रतिष्ठानकडून दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम सुरु असताना पाऊस सुरु झाला. मोकळ्या मैदानावर असलेल्या या कार्यक्रमात पावसात भिजत गौतमची चाहतेही थांबून राहिले. मग गौतमी पाटील हिनेसुद्धा कार्यक्रम थांबवला नाही. ती सुद्धा भर पावसात थिरकली. आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजाने चाहत्यांचे मनोरंजन केले. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असताना गौतमी पाटील हिच्या अदाकारींवरती बेधंद होऊन प्रेक्षकही नाचू लागते. अनेक दिवसानंतर गौतमी पाटील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

https://x.com/jitendrazavar/status/1827596367058907230?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1827596367058907230%7Ctwgr%5E7841d4dd0c7c914573433290af7452f8acaa0287%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fgautami-patil-dances-in-the-rain-in-pune-marathi-news-1257681.html