मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर काल अजय बारसकर यांनी अनेक आरोप केले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर आज अजय बारसकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर फडणवीसांच्या मंत्र्यांचा हात आहे, असं म्हणत हल्लाबोल केला आहे. अजय बारसकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे, असंही मनोज जरांगे म्हणालेत.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मी माझा मराठा समाज एक केला. चूक केली का मी? मी काय केलं ते मला सांगा. मी नावं ठेवण्यासारखं काय केलं आहे. जनतेला मायबाप म्हणालो, मी त्यांना मायबाप नाही म्हणायला हवं का? असा सवालही जरांगे यांनी बारसकरांना केला आहे.
अजय बारसकर यांनी महिलेवर बलात्कार केल्याचे त्यांच्या गावातील लोक सांगत आहेत. हे ट्रॅप आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक बडा नेता आहे. ज्या महिलेचा विनयभंग झाला ते प्रकरण दाबलं गेलं आहे. ते प्रकरण उघडं करू नाहीतर तू जरांगेंच्या विरोधात बोल, असा दबाव त्याच्यावर आहे, तो आमदार बच्चू कडू यांच्यासोबत येत होता. आम्ही त्याला मानतही नाही, तो कोण आहे ते आम्हाला माहिती नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.ज्या व्यक्तिला कोणी विचारत नाही, त्याच्यावर सरकारचा हात असल्याशिवाय इतकं होऊ शकतं का?.मी बारसकर यांच्या हाताने पाणी पिलो असतो तर ते मोठे झाले असते, म्हणजे त्यांनी जाऊन सांगायचं मी जरांगेंचं उपोषण सोडवलं माझ्यासोबत जे नेते होते,त्यांना मंत्री करा, मी त्याला मोठं करायचं का? असा सवालही जरांगेंनी केला आहे.