मराठा आंदोलक आक्रमक…. तहसीलदारांची गाडी फोडली…

0
890

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जालना शहरात उमटले.‌ मराठा समाजबांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी लवकर भेट न दिल्याने संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची गाडी फोडली आहे. जालना मंठा रोडवरील बाजी उमरद फाट्यावर ही घटना घडली आहे.

जालना तालुक्यातील बाजीउम्रद गावात मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांना चर्चेसाठी येण्याची मागणी होती. दरम्यान तहसीलदार छाया पवार या जालन्यावरून आंदोलकांची भेट घेण्यासाठी बाजीउम्रदला जात असताना बाजीउम्रद फाट्यावर आंदोलकांनी तहीलदारांची गाडी आडवत दगडफेक केली. दरम्यान घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा असून सध्या परिसरात शांततापूर्ण तणावाचे वातावरण आहे.