Monday, May 20, 2024

ठाकरे गटाच्या अडचणीत मोठी वाढ, जिल्हाप्रमुखांना पोलीस अधिकाऱ्यांनी धाडली थेट तडीपारीची नोटीस

नाशिकमध्ये ऐन निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखांना तडीपारची नोटीस देण्यात आली आहे. नाशिक निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस आल्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

परिमंडल दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत नाशिकमध्ये ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस आली आहे.काही दिवसांपूर्वी भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ताशी संबंध असल्याचा आरोप केला होता. समोर आलेला व्हिडीओ खोटा आहे. त्यात मोर्फिंग करून त्यांना दाखवण्यात आल्याचं सुधाकर बडगुजर म्हणाले होते.

काल शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणात बडगुजर यांचं नाव न घेता सलीम कुत्तावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही भाषणात भुसेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर आज सकाळीच नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस काढल्याने राजकीय विरोधातून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस मिळाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles