Tuesday, May 28, 2024

कर्नाटकात कॉंग्रेसने एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी आरक्षणात समावून घेतलं, आता हाच फॉर्म्युला ते देशभर राबवणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंणगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरमधील तपोवन मैदानात सभा झाली. यावेळी मोदींनी काँग्रेसवर घाणाघाती आरोप केले

.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक काँग्रेस सरकारचा संदर्भ देत काँग्रेवर टीका केली. कर्नाटमध्ये काँग्रेस सरकारने ओबीसी कोट्यातील 27 टक्के आरक्षणात मुस्लिमांना सामावून घेतल आणि येथील मुस्लिमांना ओबीसी बनवलं असा खळबळजनक दावा करत ओबीसींच्या हक्काचं आरक्षण लुटलं असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. तसंच, हा फॉर्मुला देशभरात लागू करण्याचा यांचा प्रयत्न आहे असंही मोदी यावेळी म्हणाले.

2012 मध्ये युपीए सरकाने हा प्रयत्न केला होता. पंरतु, त्यावेळी यांना यश आलं नाही. परंतु, काँग्रेस आता संविधान बदलून ओबीसी, दलीत आदिवासी यांच्या वाट्याचं आरक्षण मुस्लीमांमध्ये वाटणार आहे असा दावाही मोदींनी यावेळी केला. त्यामुळे यांना एकही जागा मिळता कामा नये असंही मोदी यावेळी म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles