Saturday, May 18, 2024

LPG सिलिंडर झाला स्वस्त, निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा

देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. त्यानुसार, एलपीजी सिलिंडर आजपासून १९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, हे बदल केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाले आहेत.
तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३० रुपयांची कपात करण्यात आली होती.

आता तेल कंपन्यांनी पुन्हा १९ रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७४५.५० रुपये झाली आहे. तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १६९८.५० आणि चेन्नईमध्ये १९११ रुपयांना मिळणार आहे. आजपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८०३ रुपये आहे. तर मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे. त्याचवेळी उज्ज्वला लाभार्थ्यांना १४.२ किलोचा सिलेंडर ६०३ रुपयांना मिळत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles