१९९४ मध्ये हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. प्रभुदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नगमा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांची चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. परंतु, आता पुन्हा एकदा रील्समुळे हे गाणं चर्चेत आलं आहे.
सोशल मीडियावर सध्या प्रभुदेवाच्या या लोकप्रिय गाण्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत कोणालाही या गाण्यावर रील्स बनवण्याचा मोह आवरत नाहीये. अगदी बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील या गाण्यावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या दिलखेचक अदांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.“प्रेमिकाने प्यार से…” या गाण्यावर माधुरीने खास बॉलीवूड स्टाईलने डान्स केला आहे. हिरव्या रंगाच्या भरजरी ड्रेसमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे. माधुरीच्या या रील्स व्हिडीओचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.