Monday, May 20, 2024

अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात! बॅनरबाजीमुळे चर्चा

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आणि लोकसभेची निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात होती. त्याला पुष्टी देणारे बॅनर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात लागले आहेत. हा मतदारसंघ भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप माधुरी दीक्षित हिला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार का, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माधुरी दीक्षित हिच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी मोदी सरकारने केलेल्या कामाचे बुकलेट शाह यांनी माधुरी दीक्षित हिला भेट दिले हेाते. त्या भेटीनंतर माधुरी दीक्षित ही भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली होती. त्यावर खुद्द माधुरी हिने आणि भाजपकडूनही भाष्य करण्यात आले नव्हते. मात्र, माधुरी ही निवडणुकीच्या राजकारणात उतरणार, अशी चर्चा तेव्हापासून रंगली आहे.

उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ पूनम महाजन यांचा आहे. या मतदारसंघातून पूनम महाजन ह्या दोन निवडणुका निवडून आलेल्या आहेत. सध्याही हा मतदारसंघ भाजपला पोषक मानला जातो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles