विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देताना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. या निकालात दोन्ही गटातील कोणत्याही आमदारास अपात्र ठरवण्यात आले नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत. त्यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात गद्दार कोण? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत एक्स अकाउंटरुन ट्विट करण्यात आले आहे. त्यात चार ओळी दिल्या आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आधी वाचवली शिवसेना, मग सोडवला धनुष्य. आज सिद्ध झाला निर्णय, कोण आहे गद्दार मनुष्य. !! विजय शिवसेनेचा.. विजय हिंदुत्वाचा !!”. त्याचवेळी सोबत आरसा असणारे कार्टून काढले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे आरसा दाखवत असल्याचे दिसत आहे.