Monday, March 4, 2024

Ahmednagar News मुद्दल मिळाली, व्याजाचं काय ? सावकाराकडून जीवघेणा त्रास…गुन्हा दाखल

सावकाराने कर्जवसुलीसाठी तगादा लावून दुचाकी वाहन उचलून नेले. तसेच शिवीगाळ करत जगणे असहाय्य केल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

सचिन सुरेश गवळी (वय ४४४ रा. खाटीक मळा, राजेंद्रनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावकार राजू सयाजी रासकर (रा. मोतीनगर, केडगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नुसार, सचिन गवळी यांनी सन २०१४ ते सन २०१५ साली वेळोवेळी राजू रासकर याच्याकडून पाच लाख ४५ हजार रुपये घेतले होते. दरम्यान सचिन गवळी यांनी सन २०१६ ते सन २०२२ पर्यंत वेळोवेळी व्याज स्वरूपात पाच लाख पन्नास हजार रुपये राजू रासकर यांना परत केले आहे.

बुधवारी सकाळी सचिन गवळी हे त्यांच्या मुलीला शाळेत घेऊन जात असताना रासकर याने त्यांना थांबविले. शिवीगाळ करून ‘माझे अजून सात लाख रुपये व्याजाचे बाकी आहे, ते तू मला परत दे म्हणत त्यांनी सचिन यांची दुचाकी नेली असून व्याजाचे सात लाख रुपये आणून देण्यासाठी सचिन यांच्याकडे तगादा सुरू केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles