राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीत दाटीवाटीनं बसताना दिसत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे मागच्या सीटवर फारशी जागा नाहीेये, तरी देखील अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन मागच्या सीटवर दाटीवाटीनं बसलेले दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.