शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस, मान्सूनच आगमन वेळेतच..

0
18

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मान्सून महाराष्ट्रातदेखील मान्सून वेळेवर दाखल होणार असून साधारणपणे 7 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यात मान्सून चार दिवस उशीराने म्हणजे 11 जून रोजी दाखल झाला होता. यंदा मात्र 7 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होत असून ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यावेळी देशात चांगल्या पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.