Monday, May 6, 2024

लखनौमधील जमीन, लंडनमधील प्रॉपर्टी…सगळच बाहेर काढेल, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा

लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंना ( इशारा दिला आहे. आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. मर्यादेबाहेर गेल्यानंतर आमच्याकडे खुप काही आहे. लंडनच्या विश्रांतीचा उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय? आमच्याकडे सगळं आहे. लखनौमध्ये 200 एकर जमीन चतुर्वेदींची पकडली त्याबरोबर कोण आहे सगळं माहीत आहे. लंडनमधल्या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत सगळं माहिती आहे सगळे कागदपत्र आहे. पण आम्ही मर्यादा पाळतो. वैयक्तिक आरोप करणं बाळासाहेबांनी आणि आनंद दिघेनी नाही शिकवलं. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण बाळासाहेबांची संस्कृती विसरले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles