Monday, May 6, 2024

मंत्री विखे यांनी आपले चिरंजीव कोणाला सोबत घेऊन फिरत आहेत याचे आधी आत्मपरीक्षण करावे…आ. प्राजक्त तनपुरे यांची टीका

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी अगदी साध्यापद्धतीने उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरताना आमदार प्राजक्त तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तनपुरे म्हणाले, ‘मंत्री विखे यांचे चिरंजीव सध्या कोणत्या लोकांना घेऊन फिरत आहेत. काल मिरवणुकीत ज्यांचे फोटो नाचवले गेले, त्यांच्याबद्दल अगोदर आत्मपरीक्षण करावे. आपण ज्या लोकांना घेऊन फिरतोय, विशेषतः नगर तालुका आणि नगर शहरामध्ये, त्यांच्याविषयी लोकांचे त्यांच्याकडे बघण्याचा काय मत आहे. हे तपासून बघावे. कोणाची दहशत आहे. कोण कशातील आरोपी आहे. कोणी एसपी ऑफिस फोडले होते. नगर तालुका आणि नगर शहरात कोणाची दहशत आहे. त्याविषयी आत्मपरीक्षण करावे. मग समोरच्या विषयी बोलावे.’

जी व्यक्ती सर्वसामान्यांच्या सुख, दुःखाला धावून जाते. त्याला दहशत कशी म्हणावी. त्यांच्या पण काही क्लीप आहेत. त्यांच्यात पक्षाच्या खासदाराला धमकी दिल्याची क्लीप आहेत. आपण दहशतीवर बोलावे हे दुर्दैव आहे, असेही आमदार तनपुरे यांनी म्हटले.महाविकास आघाडीच्या राज्यात कमीत कमी 30 जागा येतील. मी जनमताचा कानोसा घेऊन निरीक्षण नोंदवत आहे, असेही प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles