शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नार्वेकरांच्या हालचालींना जोरदार वेग आला. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. पण अशातच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मोठे विधान केले आहे.
2024 मध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील”, असे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले. याच वेळी त्यांनी “2024 नाही तर 2034 पर्यंत देशात नरेंद्र मोदी यांचेच सरकार राहणार आहे”, असा दावा एका वृत्तवाहीनीशी बोलताना केला. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.






