विधिमंडळातील शिवसेना पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असून विधिमंडळात शिवसेना हा एकच पक्ष आहे. त्यामुळे एका पक्षात दोन व्हीप असू शकत नाहीत. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे, आमदार भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रतोद आहेत.
त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार हे याच शिवसेना पक्षाचे आहेत. त्यामुळे भरत गोगावले यांचाच व्हीप त्यांना लागू होईल,’’ असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज स्पष्ट केले. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी व्हीपबाबत स्पष्टीकरण दिले होते.
या निकालानंतर प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना नार्वेकर यांनी व्हीप बाबतची शंका दूर केली. ते म्हणाले, ‘‘मूळ राजकीय पक्षाबाबत निर्णय दिला असल्याने व्हीप म्हणून भरत गोगावले यांनाच मान्यता मिळाली आहे.
त्यामुळे त्यांचाच व्हीप दोन्ही गटांना लागू होईल आणि तो बंधनकारक असेल. जातो आहे.