मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मोरे यांनी वंचित आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मोरे यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले. या लोकसभा निवडणुकीत मोरे यांना पुणे मतदारसंघात ३२ हजार मते मिळाली होती. मोरे यांच्या पक्षप्रवेशाने पुण्यात शिवसेनेला बळ मिळणार आहे.






