Saturday, April 27, 2024

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आज आपल्या कार्यकर्त्यांसमोर अक्षरश: रडले. त्यांनी आज आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी जनतेची आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली. आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण व्हायला सहा महिने शिल्लक असताना आपण राजीनामा देतोय याचं वाईट वाटतंय. पण आपल्याला दिल्लीत जावून भूमिका मांडायची आहे. काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल, अशी भूमिका निलेश लंके यांनी मांडली. यावेळी ते प्रचंड भावूक झाले. त्यांना पारनेरच्या नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली.

आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना निलेश लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते भावूक झाले. दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असं निलेश लंके म्हणाले. यावेळी निलेश लंके यांनी राजीनामा वाचून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असं निलेश लंके यांनी जाहीर केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles