आधी नेत्यांना गावबंदी , आता राजीनामा सत्र, मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढली…

0
697

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील काळूसच्या ग्रामपंचायत सदस्या प्रियंका खैरे यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे २०२१ ला त्या पहिल्यांदाच निवडून येऊनही त्यांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवले आहे. पुढाऱ्यांना गावबंदीसारखी या अस्त्राची व्याप्तीही वाढत जाण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यास मराठवाड्यातून सुरवात झाली.तर,पश्चिम महाराष्ट्रात ती पुण्यात खेडमध्ये प्रथम अंमलात आली. त्यानंतर याच तालुक्यातून आता राजीनाम्याचे हत्यार आरक्षणासाठी उपसले गेले आहे. खैरे यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच तेथे पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचेही मराठा समाजाने ठरवले.यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे