मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह पिटीशनबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी..

0
34

राठा आरक्षणाबाबत क्युरेटीव्ह पीटीशनबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. मराठा आरक्षणावर सुनावणी घ्यायची की नाही यावर उद्या होणार निर्णय होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात क्युरिटीव्ह पिटीशन मांडण्याचा प्रयत्न 13 ऑक्टोबरला करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोर्टाने आम्ही योग्यवेळी दाखल करून घेऊ, असं सांगितलं होतं. आता उद्या ही पीटिशन लिस्टेड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली होती. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 20 एप्रिल 2023 ला वाजता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर चर्चा झाली होती.