Friday, May 3, 2024

पार्थचा पराभव अजितदादा विसरले, पण मी यावेळी बदला घेणार…रोहित पवारांचे वक्तव्य…

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभेतून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र, या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता. रोहित पवार यांनी हाच मुद्दा उकरुन काढत अजित पवार आणि पार्थ पवार यांना डिवचले आहे. रोहित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या भावाचा पराभवाचा बदला घेण्याची भाषा केली आहे.

माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजित दादा करत आहेत. पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजित दादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्याने ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार करतायेत. मात्र, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय, अशी प्रतिज्ञाच रोहित पवार यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles