Sunday, May 19, 2024

शरद पवारांचे सर्व दौरे रद्द; अमोल कोल्हेंकडून पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांचे आजचे सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. ‘शरद पवार यांना उन्हाचा त्रास झाला आहे, ते दिवसाला तीन ते चार सभा घेत असतात. सहाजिकच वयाचा विचार करता त्याचा त्यांच्या प्रकृतीवर थोडासा परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना एक दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे,’ असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles