मोदींनी शरद पवारांना ‘पद्मविभूषण’ हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीविषयक कामांसाठी दिलं ..

0
350

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डीत दर्शन घेऊन नंतर निळवंडे धरणाचं लोकार्पणही केलं. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. “राज्यातील मोठे नेते केंद्रात कृषीमंत्री होते, पण त्यांनी शेतीसाठी काय केलं?” असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. यावरून आता शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी मोदींच्या टीकेवर मिश्किल टिप्पणी केली आहे. टीव्ही ९ शी बोलताना सुप्रिया सुळेंनी मोदींच्या भाषणावर मिश्किल टिप्पणी केली आहे. “जयंत पाटलांच्या पोस्टमध्येच बरीच उत्तरं आहेत. एकतर मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीविषयक कामांसाठी दिलं आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रात आल्यावर ते शरद पवारांचं नाव नेहमीच घेतात. कधी प्रेमानं, कधी टीका करताना. राजकारणात एवढं तर चालतंच, इतना तो हक बनता है”, असं सुप्रिया सुळे ययावेळी म्हणाल्या.